Posts

Showing posts from 2020

सरते वर्ष आणि त्याच्या खुणा...

Image
         दर वर्षी प्रमाणेच 2020 चे देखील स्वागत लोकांनी धूमधडाक्यातच केले. कोणालाही अंधूकशी कल्पनादेखील नव्हती, की 2020 हे वर्ष केवढे मोठे संकट, अगदी मानवतेचे अस्तित्व धोक्यात येईल येवढे मोठे संकटं घेवुन येईल याचे.           बघता-बघता दोन महिने सरले नि मार्च आला, सोबत कोरोनाचे संकट जगावरती घेऊन. सुरूवात तर कोरोनाची 2019 मध्येच झाली होती, परंतु त्याचा हाहाकार 2020 मध्ये सुरू झाला. एका देशाचा निष्काळजीपणा म्हणा किंवा त्याचा आडमुठेपणा म्हणा, त्याची किंमत सार्या जगाला चुकवावी लागली, लाखो लोकांचे प्राण गमवुन.           एका छोट्याशा शहरामधून निर्माण झालेला हा कोरोनारूपी राक्षस हळूहळू अजस्त्र रुप धारण करून आपले पाय ईतर देशांमध्ये पसरायला लागला. सुरूवातीला याचे गांभीर्य कोणाला कळले नाही, परंतु जेव्हा या राक्षसाने युरोप सारख्या विकसित देशांमध्ये, जिथे सगळ्यात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध आहे, तिथे आपले आक्राळ-विक्राळ रूप धारण करून हजारो लोकांना गिळंकृत केले तेव्हा कुठे जगाने याला गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली....

हायब्रीड कायदा...

       समाजातील संघर्ष टाळण्यासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे. पण आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहीले तर आपल्या लक्षात येईल की, समाज आणि कायदा यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आणि जेव्हा कायदा आणि समाज यामध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा समाजाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उभे राहते.                         सध्या आपल्या देशात जे चालले आहे, जसे की, नागरिकत्व कायद्याविरूध्द लोक रस्त्यावर उतरले होते, संसदेमध्ये देखील गदारोळ चालू होता. आज कृषी कायद्यांच्या विरोधात लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. जर कायदे लोकांसाठी असतात, तर मग त्याच कायद्या विरोधात लोक रस्त्यावर का उतरत आहेत??        सरकारने यावरती विचार करण्याची गरज आहे. स्पष्ट बहूमत याचा अर्थ मनमानीपणे वागणे, घटनेच्या मुळ गाभ्यालाच(धर्मनिरपेक्षता-ठराविक एका धर्माला वगळणे,राज्यांना डावलने) धोका पोहोचेल असे कायदे करणे असा होत नाही. या कायद्यामुळे केंद्र-राज्य संबंधामध्ये देखील ठिणगी पडली आहे. कृषी हा विषय समवर्ती सुचीत असता...

तरूणाई आणि तंत्रज्ञान..

       सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मुख्यत: तरूणांच्या दृष्टीने तर याला खुपच महत्त्व आहे, तरूणांना याचे आकर्षण जास्त असते. एकादे नवीन गँजेट, मोबाइल बाजारात आला की तरूणाई ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. तंत्रज्ञानाने जगामध्ये अनेक चमत्कार देखील घडविले आहेत. तरीदेखील सगळीकडे याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांवर चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडिया, मेसेज अॅप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटासअँप यांच्या मुळे सगळे जगच जणू एक परिवार बनले आहे. (वसुधैव कुटुम्बकम्),म्हणजेच सगळे जग जोडले गेले आहे. घरात बसुनच अनेक कामे आँनलाईन करता येऊ लागली आहेत, जगात घडणाऱ्या घटनांची माहीती घरबसल्या मिळत आहे, एकप्रकारे तंत्रज्ञानाने जीवन सुलभ केले आहे.         अनेक क्षेत्रांना तंत्रज्ञानाने व्यापुन टाकले आहे. यामुळे अनेक फायदे झाले आहेत. पण सध्याची आपली तरूण पिढी ज्याप्रकारे याचा अनियंत्रित वापर करत आहे, त्यामुळे याचे अनेक चांगले परिणाम असले तरी वाईट परिणामच जास्त होताना दिसत आहेत. येथे आपण एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली ...

Atmanirbhar Bharat (Self-reliant India)...

Image
       Today, all countries are closed due to the lockdown. All transactions with each other have stalled. The situation is the same at home(each country). Therefore, the message given by the Prime Minister to become self-reliant is very important.         The 21st century is India's century and the way to achieve it is through the 'Atmanirbhar Bharat' ' Self-reliant I ndia'. The definition of self-reliance in the world today has completely changed. Self-reliance is different than being self-centered. The tradition and culture of India also speaks of the self-reliance whose soul resides in the "Vasudhaiva Kutumbakam". That is why India supplied medicines to other countries even during this epidemic. Self-reliance will help boost the confidence of our country. So it will help us to survive in the world competition. And globalization is also necessary. And it will last forever.         Self-reliance does not mean stopping, boycot...

पुस्तक...

एकटेपणात साथ देतात, ध्येयाच्या मार्गात वाटाड्या बनतात पुस्तके... करतात बुध्दीची मशागत, प्रेरणेचा स्रोत बनतात पुस्तके... बनवितात विचारांना परिपक्व, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात पुस्तके... तिमिरातुनी तेजाकडे, ज्ञानमय बनवितात पुस्तके... सदैव सोबत करणारा आणि कधीही साथ न सोडणारा प्रामाणिक मित्र म्हणजे पुस्तके... -शिवाजी पाटील

साक्षर असणे...

साक्षर असणे म्हणजे केवळ लिहता आणि वाचता येणे, उच्चतम शिक्षण घेणे इथपर्यंतच सिमित नाही, तर त्यापुढे जावून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पाहणे, सर्व बाजू समजून घेणे, त्यावरती विचार करणे आणि त्यांचा योग्य तो अन्वयार्थ लावणे होय. एखादी गोष्ट स्वत:हून जाणून घेत असताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, त्याकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता, भावनिक होऊन विचार न करता, किंवा फक्त प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने कृती न करता, लोकांनी चांगले म्हणावे किंवा सोशल मीडियावर वाहवा मिळावी याचा विचार न करता, जे सत्य असेल ते कोणतीही भिती मनामध्ये न बाळगता मांडणे. -शिवाजी पाटील

#WhatIsThePurposeOfLife

        सर्वसामान्य माणसाची खुप ईच्छा असते विमानात बसण्याची. त्याचे स्वप्न असते ते. म्हणजे जे मोठ्या लोकांसाठी साधन असते ते सर्वसामान्य माणसाचे साध्य असते. मग तो मेहनतीच्या जोरावर मोठा होता, आणि एकदाची ती विमानात बसण्याची ईच्छा पुर्ण करण्याची वेळ येते. मनामध्ये भिती पण असते आणि बसण्याचा आनंद देखील, तो पहिला प्रवास तो खुप एन्जॉय करतो, तो आनंद सर्वांशी शेअर करतो आणि जे कधी बसलेले नसतात विमानात ते त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याचा आनंद द्विगुणित करतात.         परंतू काही दिवसांनी त्या व्यक्तीला कामानिमित्त विमान प्रवास आता रोजचाच व्हायला लागतो. आणि मग आधी जे त्याचे साध्य होते ते आता फक्त साधन होऊन जाते. आणि मग तो दुसरे साध्य मिळविण्यासाठी पहिल्या साध्याचा साधन म्हणून वापर करतो. म्हणजेच आता त्याच्या आनंदात विमानाला कोणतेही स्थान नसते. अशी ही प्रक्रिया निरंतरपणे चालू राहते. माणसाच्या अपेक्षा काही संपत नाहीत.         अशाप्रकारे आपण साधन हेच साध्य मानून मृगजळाच्या मागे धावत असतो, पण साध्य मिळविल्याचा थांबा काही येत नाही. या चक्रव्यूह...

#जीवन #अपेक्षा #कर्म

       प्रत्येक वेळी दुसऱ्या कडून जर आपण अपेक्षा करत राहीलो तर अपेक्षित असे घडले नाही की मग निराशा वाट्याला येनारच. प्रत्येक गोष्ट आपल्याला अनुकूल होईलच असे नाही. कधी कधी आपल्या मनाविरूद्ध म्हणजेच आपल्याला प्रतिकुल देखील गोष्टी घडू शकतात. त्यामुळे प्रतिकुलतेला तोंड देणार असा निर्धार करूण वाटचाल करणे कधीही चांगले म्हणेल मी.        आणि जर कधी अनुकूल घडले तर त्याचा आनंदही द्विगुणित होईल आणि जर का प्रतिकुल घडले तर मनाची आधीच तशी तयारी केल्यामुळे काहीच हानी होणार नाही. त्यामुळे या अपेक्षेच्या मायाजाळात अडकून पडण्यापरिस गीतेत म्हटल्याप्रमाणे:         "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।          मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥"              म्हणजेच आपल्या वाट्याला आलेले कर्म कोणतीही अपेक्षा न ठेवता करत राहायचे आणि फळ मिळत नाही म्हणून कर्माचा त्याग न करता कर्मवादी बनलो, तर जीवन जगण्यात आनंद मिळेलच, त्याचबरोबर जीवनाचा हा प्रवास खडतर किंवा ओझे न ठरता तो एक आनं...

आठवणींचा खजाना आणि मनाची भरारी...

लाँकडाऊनच्या या काळात आता नवीन असे काही करता येत नसल्याने, निसर्गात मनसोक्त फिरता येत नसल्याने, मित्र, आपले स्नेही यांना भेटता येत नसल्याने, तोचतोचपणा आल्याने मन देखील कधीकधी खुप बोअर होते. आणि मग स्वतःचेच समाधान करण्यासाठी स्मृतीच्या कपाटातील जुन्याच आठवणी, जुन्याच घटना, जुनीच स्नेहस्मरणे काढून त्यांच्याशी खेळत बसते. आणि जर येवढ्याने देखील तहान शमली नाही, तर मग काल्पनिक आशेचे पंख पसरून भविष्यात भरारी घेण्याचा प्रयत्न करते. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसेच मन देखील काल्पनिक पंखाचा आधार घेऊन उंच-उंच भरीरी घेते आणि जसे पक्षी आकाशात उंच उंच भरारी घेतात, परंतु सांजवेळी पुन्हा आपल्या घरट्याकडे येतात, अगदी तसेच मन देखील मनसोक्त हुंदडल्यानंतर पुनश्च वर्तमानात येऊन स्थिरावते. हे असे चाललय सध्या जीवन. #मन_तो_मन_है_समझाने_से_थोडेही_मानता_है। -शिवाजी पाटील
Image
     🚩🚩छत्रपती संभाजी महाराज!! 🚩🚩 प्रखर बुद्धिमत्ता, अफाट विद्वत्ता, उत्तम लेखक, कवी, असामान्य कर्तृत्व, निडर नेतृत्त्व, कुशल प्रशासक, महापराक्रमी, पराकोटीचे सहास अंगी असलेले, सर्वगुणसंपन्न, बहुभाषिक, प्रतिभाशाली, साहित्यिक, स्वाभिमान, स्वराज्यभिमानी, छत्रपती संभाजी महाराज! महान शासक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. नेहमी स्वराज्य नजरेसमोर ठेवून, शिवाजी महाराजांच्या तत्वांपासून कधीही न ढळलेले, त्यांनी घालुन दिलेल्या तत्वांवरती चालत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचे रक्षण करणारे. कल्पना करा की ते जिवंत असताना, त्याची बोटं तोडण्यात आली, त्याचे डोळे गरम सळीने खेचले गेले, जिभे तोडली गेली, सतत 40 दिवस हा छळ चालू होता. तरीही त्यांनी हे छळ सहन केले आणि औरंगजेबा समोर झुकण्यास नकार दिला, यातूनच त्यांचे खरे सामर्थ्य आणि अविश्वसनीय मानसिक खंबीरपणा दिसून येतो. शेवट पर्यंत अपराजित राहीले, आणि मृत्यूला देखील पराभूत करून गेले. असे हे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज नेहमीच महान राजांपैकी एक म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जातील. अशा या महान रा...

#तापमानवाढ #विकास

        एका संशोधनातून गंगेच्या पाण्याची गुणवत्ता ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. कारण कोरोनामुळे केंद्र सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता बाकीचे सर्व व्यवहार(कार्बन उत्सर्जन)करणारे पुर्णपणे ठप्प झाले आहेत.          पण इथे कोरोनाच्या संकटामुळे हे प्रदूषण कमी झाले आहे. त्यानंतर काय??  हे संकट गेल्यानंतर जैसे थी परिस्थिती होणार. तापमान वाढीसारख्या संकटाला आपण कसे सामोरे जाणार?? तापमान वाढीचे वातावरणावर होणारे परिणाम थांबविण्यासाठी २०२० पासुन कार्बनचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. सध्या तरी हे कोरोनामुळे साध्य होताना दिसत आहे. पण त्यानंतरचे काय?                     कारण तापमान वाढीचे संकट खुपच गंभीर असणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार दर वर्षी कार्बन उत्सर्जनात ७.६  टक्क्यांनी घट झाली तरच जागतिक तापमान वाट १.५ डिग्री सेल्सियसने कमी करता येईल. हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा सर्व राष्ट्रे...
       काही लोक खूप विद्वान असतात, त्यांचा अफाट अभ्यास असतो, म्हणजेच ते पुस्तक पंडीत असतात. त्यांच्या मते लोकमतापेक्षा पुस्तकी ज्ञान श्रेष्ठ असते, त्यांनी जे वाचलेले असते त्याच्या आधारावर ते लोकांचे मोजमाप करत असतात.        आणि जर का लोक त्याच्या विपरीत वागले तर ते लोकांना मुर्ख ठरवून टाकतात, आणि याबाबतीत या पुस्तक पंडितांचा आत्मविश्वास अफाट असतो. पण ईथे एक गोष्ट आवर्जून नमूद कराविशी वाटते की, प्रत्येक ठिकाणी पुस्तकी ज्ञान उपयोगी येतेच असे नाही.         कारण माणूस हा विवेकशील प्राणी आहे, तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून परिस्थिती नुसार वागत असतो. त्यामुळे तो नेहमी एकसारखाच वागेल(पुस्तकी पंडितांच्या नजरेतून) अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणा ठरेल.          याचा अर्थ असा नाही होत की पुस्तकी ज्ञान गरजेचे नाही, पुस्तकी ज्ञान अत्यंत आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर समाजात वावरणे, लोकांशी संवाद साधने, वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी देणे देखील तितकेच आवश्यक आहे. यातून समाज, संस्कृती, माणसे यांची ओळख होईल, त्याचबरोबर...

क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥ स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥

    क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥       स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥               क्रोध हा मानवामध्ये असणारा एक भाव आहे, जो सर्वांमध्ये असतो, पण काही जण संयमाने त्याला काबू करण्यात यशस्वी ठरतात, तर काहींना क्रोधच काबूमध्ये करतो, आणि मग त्याचे परिणाम काय होतात हे आपणा सर्वांना माहीतच आहे.        क्रोधाचे परिणाम वाईट ही असतात नि चांगलेही, पण बर्याचदा त्याचे परिणाम वाईटच होतात.. जसे की, जेव्हा आपणास क्रोध येतो, आपली शक्ति क्षीण व्हायला लागते, आपण मानसिक संतुलन गमावतो, वाणीवरील संयम गमावून बसतो, शारीरिक शक्ति असंतुलित होते, कधी कधी तर आपण क्रोधामुळे न लढताच आर्धी लढाई हरलेेलाे असतो.       याचा अर्थ असा होतो का की क्रोधाचा पुर्णपणे त्याग केला पाहिजे, तर मुळीच नाही. तर मी म्हणेल की, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी क्रोधीत झालेच पाहिजे, म्हणजेच क्रोधाला रचनात्मक स्वरूप देता आले पाहिजे.        जसे की, ज्यावेळी अफजलखान स्वराज्या...
      आज मानवाने बुध्दीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व अशी प्रगती केली आहे. एकेकाळी असाध्य असणाऱ्या गोष्टी आज साध्य करून दाखविल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र आणि मंगळासारख्या ग्रहांना देखील आपलेसे केले आहे.             वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी औद्योगिकीकरणामुळे मदत झाली आहे. आज प्रत्येक देश आपला विकास कसा होईल आणि आपण कसे आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येऊ याचाच विचार करत आहे.          विकास तर केलाच पाहीजे, गरजा पूर्ण केल्याच पाहीजेत. पण तो कसा शाश्वत असेल याकडे देखील आवर्जून लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर आपण विकासाच्या लालसेपोटी मनमानीपणे पर्यावरणाचे शोषण करायला लागलो तर विकास पाहायला पृथ्वीवर माणूसच उरायचा नाही.         लालसेपोटी मानव पर्यावरणीय शृंखलेमध्ये हस्तक्षेप करत आहे, मानव देखील या पर्यावरणीय शृंखलेचा केवळ एक भाग आहे, पण मानवाने अतिरेकी हस्तक्षेप करून ही शृंखलाच विस्कळीत केली आहे. त्याचे परिणाम म्हणून कोरोना सारखी संकटं उद्भवत आहेत. या रोगावरील उपाय ...
चीन माओवादाच्या/मार्क्सवादी मार्गाने कोरोना वीरोधी लढत आहे, आपणास लोकशाहीच्या मार्गाने लढायचे आहे, त्यामुळे सरकार सोबतच लोकांची भुमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. त्याशिवाय या रोगाला हरविता येणे शक्य नाही. -शिवाजी पाटील

Corona Effect

          Corona has caused the most damage to the poultry business. The result of the rumors being spread is that the disease is caused by eating chicken, but it has not been proven and government also announced it.               People should not spread such rumors or even believe them. What would have happened to those who had made a fresh start in this industry? If they borrowed loans from banks, how can repay it??         If the government can take responsibility for the salaries of the MLAs' car drivers, lend them a car loan. Here the role of the government is really important. Bcz these small businesses are also the backbone of our economy.           There is much to learn from Shivaji Maharaj's financial policies here. Whenever there was a drought in the state(swarajya) and it caused huge losses to the farmers, Maharaj gave tax relief to the farmers. He also assisted t...

Duty...

Image
The government has declared holidays for schools, ordered IT workers to work from home, citizens should avoid outside contact, due to fear of the Corona virus. But even with such fears, the cleaning workers are doing their job honestly without thinking of anything. -Shivaji Patil

Corona impact on common man...

Corona impact on common man...             As the corona virus grow alarmed level, people started buying masks and sanitizers in large quantities. Medical stores hv began to raise prices arbitrarily. The mask, priced at Rs 10, started to sell at a price of 200+. The local administration should look into this and make sure these basic things are available at a reasonable cost. If the demand has increased drastically, the supply side needs to pay attention as well. The government needs to look into these matters. -Shivaji Patil

Corona outbreak in India...

Image
Corona outbreak in India... If corona virus is not controlled as soon as possible it will have major effects on economy. And it can also lead to significant loss of life. Economic condition like 2008 may also occur. We are already facing financial crisis, so if this crisis comes, then there is a possibility that economic growth will have a big impact along with demand-supply chain, tourism, GDP. Considering our huge population, if the disease is spread, prevention is very difficult. The government is taking care of it as much as possible, but as citizens we have a responsibility to avoid as much contact as possible, to wash our hands with soap,wear masks. And most importantly, stay away from rumors. #COVID19india #coronavirusindia -Shivaji Patil