काही लोक खूप विद्वान असतात, त्यांचा अफाट अभ्यास असतो, म्हणजेच ते पुस्तक पंडीत असतात. त्यांच्या मते लोकमतापेक्षा पुस्तकी ज्ञान श्रेष्ठ असते, त्यांनी जे वाचलेले असते त्याच्या आधारावर ते लोकांचे मोजमाप करत असतात. 
      आणि जर का लोक त्याच्या विपरीत वागले तर ते लोकांना मुर्ख ठरवून टाकतात, आणि याबाबतीत या पुस्तक पंडितांचा आत्मविश्वास अफाट असतो. पण ईथे एक गोष्ट आवर्जून नमूद कराविशी वाटते की, प्रत्येक ठिकाणी पुस्तकी ज्ञान उपयोगी येतेच असे नाही. 
       कारण माणूस हा विवेकशील प्राणी आहे, तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून परिस्थिती नुसार वागत असतो. त्यामुळे तो नेहमी एकसारखाच वागेल(पुस्तकी पंडितांच्या नजरेतून) अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणा ठरेल. 
        याचा अर्थ असा नाही होत की पुस्तकी ज्ञान गरजेचे नाही, पुस्तकी ज्ञान अत्यंत आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर समाजात वावरणे, लोकांशी संवाद साधने, वेगवेगळ्या प्रदेशांना भेटी देणे देखील तितकेच आवश्यक आहे. यातून समाज, संस्कृती, माणसे यांची ओळख होईल, त्याचबरोबर त्या पुस्तकी ज्ञानाचा आणि प्रत्यक्ष घेतलेला अनुभव यांचा काळाशी सुसंगत असा मेळ घालून, त्या ज्ञानाचा सामाजात वावरताना नक्कीच उपयोग करता येईल.

-शिवाजी पाटील

Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...