Posts

Showing posts from June, 2020

पुस्तक...

एकटेपणात साथ देतात, ध्येयाच्या मार्गात वाटाड्या बनतात पुस्तके... करतात बुध्दीची मशागत, प्रेरणेचा स्रोत बनतात पुस्तके... बनवितात विचारांना परिपक्व, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतात पुस्तके... तिमिरातुनी तेजाकडे, ज्ञानमय बनवितात पुस्तके... सदैव सोबत करणारा आणि कधीही साथ न सोडणारा प्रामाणिक मित्र म्हणजे पुस्तके... -शिवाजी पाटील

साक्षर असणे...

साक्षर असणे म्हणजे केवळ लिहता आणि वाचता येणे, उच्चतम शिक्षण घेणे इथपर्यंतच सिमित नाही, तर त्यापुढे जावून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पाहणे, सर्व बाजू समजून घेणे, त्यावरती विचार करणे आणि त्यांचा योग्य तो अन्वयार्थ लावणे होय. एखादी गोष्ट स्वत:हून जाणून घेत असताना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, त्याकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता, भावनिक होऊन विचार न करता, किंवा फक्त प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने कृती न करता, लोकांनी चांगले म्हणावे किंवा सोशल मीडियावर वाहवा मिळावी याचा विचार न करता, जे सत्य असेल ते कोणतीही भिती मनामध्ये न बाळगता मांडणे. -शिवाजी पाटील

#WhatIsThePurposeOfLife

        सर्वसामान्य माणसाची खुप ईच्छा असते विमानात बसण्याची. त्याचे स्वप्न असते ते. म्हणजे जे मोठ्या लोकांसाठी साधन असते ते सर्वसामान्य माणसाचे साध्य असते. मग तो मेहनतीच्या जोरावर मोठा होता, आणि एकदाची ती विमानात बसण्याची ईच्छा पुर्ण करण्याची वेळ येते. मनामध्ये भिती पण असते आणि बसण्याचा आनंद देखील, तो पहिला प्रवास तो खुप एन्जॉय करतो, तो आनंद सर्वांशी शेअर करतो आणि जे कधी बसलेले नसतात विमानात ते त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याचा आनंद द्विगुणित करतात.         परंतू काही दिवसांनी त्या व्यक्तीला कामानिमित्त विमान प्रवास आता रोजचाच व्हायला लागतो. आणि मग आधी जे त्याचे साध्य होते ते आता फक्त साधन होऊन जाते. आणि मग तो दुसरे साध्य मिळविण्यासाठी पहिल्या साध्याचा साधन म्हणून वापर करतो. म्हणजेच आता त्याच्या आनंदात विमानाला कोणतेही स्थान नसते. अशी ही प्रक्रिया निरंतरपणे चालू राहते. माणसाच्या अपेक्षा काही संपत नाहीत.         अशाप्रकारे आपण साधन हेच साध्य मानून मृगजळाच्या मागे धावत असतो, पण साध्य मिळविल्याचा थांबा काही येत नाही. या चक्रव्यूह...

#जीवन #अपेक्षा #कर्म

       प्रत्येक वेळी दुसऱ्या कडून जर आपण अपेक्षा करत राहीलो तर अपेक्षित असे घडले नाही की मग निराशा वाट्याला येनारच. प्रत्येक गोष्ट आपल्याला अनुकूल होईलच असे नाही. कधी कधी आपल्या मनाविरूद्ध म्हणजेच आपल्याला प्रतिकुल देखील गोष्टी घडू शकतात. त्यामुळे प्रतिकुलतेला तोंड देणार असा निर्धार करूण वाटचाल करणे कधीही चांगले म्हणेल मी.        आणि जर कधी अनुकूल घडले तर त्याचा आनंदही द्विगुणित होईल आणि जर का प्रतिकुल घडले तर मनाची आधीच तशी तयारी केल्यामुळे काहीच हानी होणार नाही. त्यामुळे या अपेक्षेच्या मायाजाळात अडकून पडण्यापरिस गीतेत म्हटल्याप्रमाणे:         "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।          मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥"              म्हणजेच आपल्या वाट्याला आलेले कर्म कोणतीही अपेक्षा न ठेवता करत राहायचे आणि फळ मिळत नाही म्हणून कर्माचा त्याग न करता कर्मवादी बनलो, तर जीवन जगण्यात आनंद मिळेलच, त्याचबरोबर जीवनाचा हा प्रवास खडतर किंवा ओझे न ठरता तो एक आनं...