Posts

Showing posts from December, 2020

सरते वर्ष आणि त्याच्या खुणा...

Image
         दर वर्षी प्रमाणेच 2020 चे देखील स्वागत लोकांनी धूमधडाक्यातच केले. कोणालाही अंधूकशी कल्पनादेखील नव्हती, की 2020 हे वर्ष केवढे मोठे संकट, अगदी मानवतेचे अस्तित्व धोक्यात येईल येवढे मोठे संकटं घेवुन येईल याचे.           बघता-बघता दोन महिने सरले नि मार्च आला, सोबत कोरोनाचे संकट जगावरती घेऊन. सुरूवात तर कोरोनाची 2019 मध्येच झाली होती, परंतु त्याचा हाहाकार 2020 मध्ये सुरू झाला. एका देशाचा निष्काळजीपणा म्हणा किंवा त्याचा आडमुठेपणा म्हणा, त्याची किंमत सार्या जगाला चुकवावी लागली, लाखो लोकांचे प्राण गमवुन.           एका छोट्याशा शहरामधून निर्माण झालेला हा कोरोनारूपी राक्षस हळूहळू अजस्त्र रुप धारण करून आपले पाय ईतर देशांमध्ये पसरायला लागला. सुरूवातीला याचे गांभीर्य कोणाला कळले नाही, परंतु जेव्हा या राक्षसाने युरोप सारख्या विकसित देशांमध्ये, जिथे सगळ्यात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध आहे, तिथे आपले आक्राळ-विक्राळ रूप धारण करून हजारो लोकांना गिळंकृत केले तेव्हा कुठे जगाने याला गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली....

हायब्रीड कायदा...

       समाजातील संघर्ष टाळण्यासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे. पण आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहीले तर आपल्या लक्षात येईल की, समाज आणि कायदा यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आणि जेव्हा कायदा आणि समाज यामध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा समाजाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उभे राहते.                         सध्या आपल्या देशात जे चालले आहे, जसे की, नागरिकत्व कायद्याविरूध्द लोक रस्त्यावर उतरले होते, संसदेमध्ये देखील गदारोळ चालू होता. आज कृषी कायद्यांच्या विरोधात लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. जर कायदे लोकांसाठी असतात, तर मग त्याच कायद्या विरोधात लोक रस्त्यावर का उतरत आहेत??        सरकारने यावरती विचार करण्याची गरज आहे. स्पष्ट बहूमत याचा अर्थ मनमानीपणे वागणे, घटनेच्या मुळ गाभ्यालाच(धर्मनिरपेक्षता-ठराविक एका धर्माला वगळणे,राज्यांना डावलने) धोका पोहोचेल असे कायदे करणे असा होत नाही. या कायद्यामुळे केंद्र-राज्य संबंधामध्ये देखील ठिणगी पडली आहे. कृषी हा विषय समवर्ती सुचीत असता...