Posts

Showing posts from July, 2021

Destiny of a nation is shaped in its classrooms. एखाद्या देशाचे भाग्य/भवितव्य त्याच्या शाळेत/वर्गात बनविले जाते.

          मुल जेव्हा जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे सामाजिकीकरण सुरू होते. सामाजिकीकरणाचा पहिला टप्पा त्यालाच आपण प्राथमिक टप्पा आपण तो म्हणजे परिवार...आई-वडील, बहीण-भाऊ. त्यानंतर येतात ते मित्र (play group) ज्यांच्या सोबत मुल खेळते. ज्याला आपण समवयस्क ग्रुप म्हणतो. हाच ग्रुप त्याच्यावरती जास्त प्रभाव पाडत असतो, अशा गोष्टी शिकवितो ज्या त्याचे आई-वडील देखील शिकवत नाहीत (ज्या गोष्टी आई-वडीलांच्या नजरेत चुकीच्या असतात).             याच काळामध्ये आणखी एका नवीन व्यवस्था (संस्था) मुलाच्या आयुष्यात येते ती म्हणजे 'शाळा', 'शिक्षक'. आई-वडीलांच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये अनौपचारिकता हा एक घटक असतो परंतु शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्ये औपचारिकता असते, त्यामुळे त्या औपचारिक नात्याने शिक्षक काही नियम बनवतात. ज्यांचे पालन मुलांना करावे लागते. नियमांचे पालन करण्याची सवय मुलांना लावली जाते, ज्यामुळे मुले समाजात राहण्या लायक बनतात, समाजाचे नियम पाळतात. म्हणजे शाळेमध्ये देशाच्या भवितव्य निर्माण होत असते. शाळेमध्ये मुलांच्या वर्तमान निर्माण ...