Posts

Destiny of a nation is shaped in its classrooms. एखाद्या देशाचे भाग्य/भवितव्य त्याच्या शाळेत/वर्गात बनविले जाते.

          मुल जेव्हा जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे सामाजिकीकरण सुरू होते. सामाजिकीकरणाचा पहिला टप्पा त्यालाच आपण प्राथमिक टप्पा आपण तो म्हणजे परिवार...आई-वडील, बहीण-भाऊ. त्यानंतर येतात ते मित्र (play group) ज्यांच्या सोबत मुल खेळते. ज्याला आपण समवयस्क ग्रुप म्हणतो. हाच ग्रुप त्याच्यावरती जास्त प्रभाव पाडत असतो, अशा गोष्टी शिकवितो ज्या त्याचे आई-वडील देखील शिकवत नाहीत (ज्या गोष्टी आई-वडीलांच्या नजरेत चुकीच्या असतात).             याच काळामध्ये आणखी एका नवीन व्यवस्था (संस्था) मुलाच्या आयुष्यात येते ती म्हणजे 'शाळा', 'शिक्षक'. आई-वडीलांच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये अनौपचारिकता हा एक घटक असतो परंतु शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्ये औपचारिकता असते, त्यामुळे त्या औपचारिक नात्याने शिक्षक काही नियम बनवतात. ज्यांचे पालन मुलांना करावे लागते. नियमांचे पालन करण्याची सवय मुलांना लावली जाते, ज्यामुळे मुले समाजात राहण्या लायक बनतात, समाजाचे नियम पाळतात. म्हणजे शाळेमध्ये देशाच्या भवितव्य निर्माण होत असते. शाळेमध्ये मुलांच्या वर्तमान निर्माण ...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

         आपण स्वतः देशाला, समाजाला पुढे घेऊन जाण्यामध्ये एक महत्वाचा घटक आहोत. आपल्या देशाचे भविष्य हे आपल्या हातामध्ये आहे. आपल्या वर्तमानातील कृती याच देशाचे भविष्य ठरविणार आहेत. कोणीतरी महापुरूष येईल तो आपल्या देशाला तारेल या असल्या भ्रामक कल्पनांमध्ये रमण्यात काहीच साध्य नाही.            त्यासाठी स्वतःला त्यादृष्टीने तयार करावे लागेल, त्यासाठी चारित्रवान, जबाबदार, सदैव सेवेस तत्पर, कर्मयोगी नागरिकांची गरज आहे. आणि त्यासाठी आपणास परिश्रम करावे लागतील, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांची सांगड घालून कार्यरत राहीले पाहीजे. ज्ञानासोबत बलोपासनाही करावी  लागेल.             महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास  करावा लागेल, कारण त्यांनी महापुरुष/नारी होण्यासाठी कोणतेही क्लास लावसे नव्हते. नाही त्यांच्याजवळ दैवी शक्ती होत्या, त्यांनी आपल्यातील सर्व शक्ती जाणुन घेवुन त्याचा वापर केला, ते आपले कर्म करत राहीले, अगदी दृढ़ निश्चयाणे, न थकता- न थाबता, आपल्या निर्णयाशी ठाम राहीले, कोणत्याही संकटाला न घ...

New scrap policy and the reality of in our country...

        Finance Minister Nirmala Sitharaman announced in her 2021-2022 budget speech that 20-year-old vehicles would be scrapped. This will help reduce pollution by about 25 to 30 per cent and buy new vehicles to replace the old ones, This will give a boost to the Auto industry.         According to the Ministry of Roads and Transport, the new scrap policy will reduce the use of vehicles that cause more pollution. Which will result in contributing to the prevention of pollution.         It is also said that with this policy, the government wants to put more emphasis on public transport. It is true that this new policy will remove many old vehicles from transportation. But when it comes to public transportation, it's still not as efficient as it should be. Considering the population of our country, our public transport system is inadequate. We have noticed this when we travelling in ST in Maharashtra. Considering the s...

सरते वर्ष आणि त्याच्या खुणा...

Image
         दर वर्षी प्रमाणेच 2020 चे देखील स्वागत लोकांनी धूमधडाक्यातच केले. कोणालाही अंधूकशी कल्पनादेखील नव्हती, की 2020 हे वर्ष केवढे मोठे संकट, अगदी मानवतेचे अस्तित्व धोक्यात येईल येवढे मोठे संकटं घेवुन येईल याचे.           बघता-बघता दोन महिने सरले नि मार्च आला, सोबत कोरोनाचे संकट जगावरती घेऊन. सुरूवात तर कोरोनाची 2019 मध्येच झाली होती, परंतु त्याचा हाहाकार 2020 मध्ये सुरू झाला. एका देशाचा निष्काळजीपणा म्हणा किंवा त्याचा आडमुठेपणा म्हणा, त्याची किंमत सार्या जगाला चुकवावी लागली, लाखो लोकांचे प्राण गमवुन.           एका छोट्याशा शहरामधून निर्माण झालेला हा कोरोनारूपी राक्षस हळूहळू अजस्त्र रुप धारण करून आपले पाय ईतर देशांमध्ये पसरायला लागला. सुरूवातीला याचे गांभीर्य कोणाला कळले नाही, परंतु जेव्हा या राक्षसाने युरोप सारख्या विकसित देशांमध्ये, जिथे सगळ्यात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध आहे, तिथे आपले आक्राळ-विक्राळ रूप धारण करून हजारो लोकांना गिळंकृत केले तेव्हा कुठे जगाने याला गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली....

हायब्रीड कायदा...

       समाजातील संघर्ष टाळण्यासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे. पण आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहीले तर आपल्या लक्षात येईल की, समाज आणि कायदा यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आणि जेव्हा कायदा आणि समाज यामध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा समाजाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उभे राहते.                         सध्या आपल्या देशात जे चालले आहे, जसे की, नागरिकत्व कायद्याविरूध्द लोक रस्त्यावर उतरले होते, संसदेमध्ये देखील गदारोळ चालू होता. आज कृषी कायद्यांच्या विरोधात लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. जर कायदे लोकांसाठी असतात, तर मग त्याच कायद्या विरोधात लोक रस्त्यावर का उतरत आहेत??        सरकारने यावरती विचार करण्याची गरज आहे. स्पष्ट बहूमत याचा अर्थ मनमानीपणे वागणे, घटनेच्या मुळ गाभ्यालाच(धर्मनिरपेक्षता-ठराविक एका धर्माला वगळणे,राज्यांना डावलने) धोका पोहोचेल असे कायदे करणे असा होत नाही. या कायद्यामुळे केंद्र-राज्य संबंधामध्ये देखील ठिणगी पडली आहे. कृषी हा विषय समवर्ती सुचीत असता...

तरूणाई आणि तंत्रज्ञान..

       सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मुख्यत: तरूणांच्या दृष्टीने तर याला खुपच महत्त्व आहे, तरूणांना याचे आकर्षण जास्त असते. एकादे नवीन गँजेट, मोबाइल बाजारात आला की तरूणाई ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. तंत्रज्ञानाने जगामध्ये अनेक चमत्कार देखील घडविले आहेत. तरीदेखील सगळीकडे याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांवर चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडिया, मेसेज अॅप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटासअँप यांच्या मुळे सगळे जगच जणू एक परिवार बनले आहे. (वसुधैव कुटुम्बकम्),म्हणजेच सगळे जग जोडले गेले आहे. घरात बसुनच अनेक कामे आँनलाईन करता येऊ लागली आहेत, जगात घडणाऱ्या घटनांची माहीती घरबसल्या मिळत आहे, एकप्रकारे तंत्रज्ञानाने जीवन सुलभ केले आहे.         अनेक क्षेत्रांना तंत्रज्ञानाने व्यापुन टाकले आहे. यामुळे अनेक फायदे झाले आहेत. पण सध्याची आपली तरूण पिढी ज्याप्रकारे याचा अनियंत्रित वापर करत आहे, त्यामुळे याचे अनेक चांगले परिणाम असले तरी वाईट परिणामच जास्त होताना दिसत आहेत. येथे आपण एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली ...

Atmanirbhar Bharat (Self-reliant India)...

Image
       Today, all countries are closed due to the lockdown. All transactions with each other have stalled. The situation is the same at home(each country). Therefore, the message given by the Prime Minister to become self-reliant is very important.         The 21st century is India's century and the way to achieve it is through the 'Atmanirbhar Bharat' ' Self-reliant I ndia'. The definition of self-reliance in the world today has completely changed. Self-reliance is different than being self-centered. The tradition and culture of India also speaks of the self-reliance whose soul resides in the "Vasudhaiva Kutumbakam". That is why India supplied medicines to other countries even during this epidemic. Self-reliance will help boost the confidence of our country. So it will help us to survive in the world competition. And globalization is also necessary. And it will last forever.         Self-reliance does not mean stopping, boycot...