तरूणाई आणि तंत्रज्ञान..
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञान जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. मुख्यत: तरूणांच्या दृष्टीने तर याला खुपच महत्त्व आहे, तरूणांना याचे आकर्षण जास्त असते. एकादे नवीन गँजेट, मोबाइल बाजारात आला की तरूणाई ते मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. तंत्रज्ञानाने जगामध्ये अनेक चमत्कार देखील घडविले आहेत. तरीदेखील सगळीकडे याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांवर चर्चा होताना दिसत आहे. सोशल मीडिया, मेसेज अॅप्स, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटासअँप यांच्या मुळे सगळे जगच जणू एक परिवार बनले आहे. (वसुधैव कुटुम्बकम्),म्हणजेच सगळे जग जोडले गेले आहे. घरात बसुनच अनेक कामे आँनलाईन करता येऊ लागली आहेत, जगात घडणाऱ्या घटनांची माहीती घरबसल्या मिळत आहे, एकप्रकारे तंत्रज्ञानाने जीवन सुलभ केले आहे. अनेक क्षेत्रांना तंत्रज्ञानाने व्यापुन टाकले आहे. यामुळे अनेक फायदे झाले आहेत. पण सध्याची आपली तरूण पिढी ज्याप्रकारे याचा अनियंत्रित वापर करत आहे, त्यामुळे याचे अनेक चांगले परिणाम असले तरी वाईट परिणामच जास्त होताना दिसत आहेत. येथे आपण एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली ...