#WhatIsThePurposeOfLife
सर्वसामान्य माणसाची खुप ईच्छा असते विमानात बसण्याची. त्याचे स्वप्न असते ते. म्हणजे जे मोठ्या लोकांसाठी साधन असते ते सर्वसामान्य माणसाचे साध्य असते. मग तो मेहनतीच्या जोरावर मोठा होता, आणि एकदाची ती विमानात बसण्याची ईच्छा पुर्ण करण्याची वेळ येते. मनामध्ये भिती पण असते आणि बसण्याचा आनंद देखील, तो पहिला प्रवास तो खुप एन्जॉय करतो, तो आनंद सर्वांशी शेअर करतो आणि जे कधी बसलेले नसतात विमानात ते त्याच्या आनंदात सहभागी होऊन त्याचा आनंद द्विगुणित करतात.
परंतू काही दिवसांनी त्या व्यक्तीला कामानिमित्त विमान प्रवास आता रोजचाच व्हायला लागतो. आणि मग आधी जे त्याचे साध्य होते ते आता फक्त साधन होऊन जाते. आणि मग तो दुसरे साध्य मिळविण्यासाठी पहिल्या साध्याचा साधन म्हणून वापर करतो. म्हणजेच आता त्याच्या आनंदात विमानाला कोणतेही स्थान नसते. अशी ही प्रक्रिया निरंतरपणे चालू राहते. माणसाच्या अपेक्षा काही संपत नाहीत.
अशाप्रकारे आपण साधन हेच साध्य मानून मृगजळाच्या मागे धावत असतो, पण साध्य मिळविल्याचा थांबा काही येत नाही. या चक्रव्यूहात अडकून साधनांनाच साध्य मानुन जीवनाचे खरे साध्य काय हेच आपण जाणुन घेत नाही. त्यामुळे आपण साधनांना साध्य मानने जेव्हा सोडून देऊ तेव्हाच आपण खरे साध्य काय आहे ते जाणू शकू.
-शिवाजी पाटील

Comments
Post a Comment