#जीवन #अपेक्षा #कर्म

       प्रत्येक वेळी दुसऱ्या कडून जर आपण अपेक्षा करत राहीलो तर अपेक्षित असे घडले नाही की मग निराशा वाट्याला येनारच. प्रत्येक गोष्ट आपल्याला अनुकूल होईलच असे नाही. कधी कधी आपल्या मनाविरूद्ध म्हणजेच आपल्याला प्रतिकुल देखील गोष्टी घडू शकतात. त्यामुळे प्रतिकुलतेला तोंड देणार असा निर्धार करूण वाटचाल करणे कधीही चांगले म्हणेल मी. 
      आणि जर कधी अनुकूल घडले तर त्याचा आनंदही द्विगुणित होईल आणि जर का प्रतिकुल घडले तर मनाची आधीच तशी तयारी केल्यामुळे काहीच हानी होणार नाही. त्यामुळे या अपेक्षेच्या मायाजाळात अडकून पडण्यापरिस गीतेत म्हटल्याप्रमाणे: 

       "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 
        मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥"
    
        म्हणजेच आपल्या वाट्याला आलेले कर्म कोणतीही अपेक्षा न ठेवता करत राहायचे आणि फळ मिळत नाही म्हणून कर्माचा त्याग न करता कर्मवादी बनलो, तर जीवन जगण्यात आनंद मिळेलच, त्याचबरोबर जीवनाचा हा प्रवास खडतर किंवा ओझे न ठरता तो एक आनंदी प्रवास होईल.

-शिवाजी पाटील



Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...