#तापमानवाढ #विकास

        एका संशोधनातून गंगेच्या पाण्याची गुणवत्ता ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. कारण कोरोनामुळे केंद्र सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता बाकीचे सर्व व्यवहार(कार्बन उत्सर्जन)करणारे पुर्णपणे ठप्प झाले आहेत. 
        पण इथे कोरोनाच्या संकटामुळे हे प्रदूषण कमी झाले आहे. त्यानंतर काय??  हे संकट गेल्यानंतर जैसे थी परिस्थिती होणार. तापमान वाढीसारख्या संकटाला आपण कसे सामोरे जाणार?? तापमान वाढीचे वातावरणावर होणारे परिणाम थांबविण्यासाठी २०२० पासुन कार्बनचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. सध्या तरी हे कोरोनामुळे साध्य होताना दिसत आहे. पण त्यानंतरचे काय?              
      कारण तापमान वाढीचे संकट खुपच गंभीर असणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार दर वर्षी कार्बन उत्सर्जनात ७.६  टक्क्यांनी घट झाली तरच जागतिक तापमान वाट १.५ डिग्री सेल्सियसने कमी करता येईल. हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा सर्व राष्ट्रे फक्त वैयक्तिक स्वार्थाचाच विचार न करता, संपूर्ण मानवतेचा विचार करतील. 
        विकास तर केलाच पाहीजे, पण तो शाश्वत कसा असेल याकडे देखील आवर्जून लक्ष दिले गेले पाहीजे. कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडूच, पण त्यातून सर्व राष्ट्रे काही तरी धडा घेतील आणि तापमान वाढीसारख्या संकटाकडे देखील तेवढ्याच गंभीरतेने पाहतील.

-शिवाजी पाटील

Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...