क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥ स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥

    क्रोधात्‌ भवतिसंमोहा्त्‌ । संमोहात्‌ स्मृतिविभ्रम॥       स्मृतिभ्रंशात्‌ बुद्धिनाशो । बुद्धिनाशात्‌ प्रणश्यती ॥
       
      क्रोध हा मानवामध्ये असणारा एक भाव आहे, जो सर्वांमध्ये असतो, पण काही जण संयमाने त्याला काबू करण्यात यशस्वी ठरतात, तर काहींना क्रोधच काबूमध्ये करतो, आणि मग त्याचे परिणाम काय होतात हे आपणा सर्वांना माहीतच आहे. 
      क्रोधाचे परिणाम वाईट ही असतात नि चांगलेही, पण बर्याचदा त्याचे परिणाम वाईटच होतात.. जसे की, जेव्हा आपणास क्रोध येतो, आपली शक्ति क्षीण व्हायला लागते, आपण मानसिक संतुलन गमावतो, वाणीवरील संयम गमावून बसतो, शारीरिक शक्ति असंतुलित होते, कधी कधी तर आपण क्रोधामुळे न लढताच आर्धी लढाई हरलेेलाे असतो. 
     याचा अर्थ असा होतो का की क्रोधाचा पुर्णपणे त्याग केला पाहिजे, तर मुळीच नाही. तर मी म्हणेल की, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी क्रोधीत झालेच पाहिजे, म्हणजेच क्रोधाला रचनात्मक स्वरूप देता आले पाहिजे. 
      जसे की, ज्यावेळी अफजलखान स्वराज्यावरती चाल करून येत होता, येताना त्याने रयतेवर अनन्वित अत्याचार केले, मंदीरे फोडली का तर शिवाजी महाराजांनी क्रोधीत होऊन गड सोडून आपल्यावरती चालून यावे(तशी त्याची योजना होती). याचा अर्थ असा होत नाही की, महाराजांना क्रोध आलाच नव्हता.  
      महाराजांना खुप क्रोध आला होता पण त्यांनी येथे क्रोधाच्या आहारी न जाता(शत्रूच्या योजनेनुसार न वागता) क्रोधाला रचनात्मक रूप दिले, म्हणजेच ते शांत राहीले आणि शत्रुला आपल्या योजनेनुसार हव्या त्या ठिकाणी यायला भाग पाडले (प्रतापगडाच्या पायथ्याशी) आणि अफझलखानाचा कोधळा फाडून क्रोध काय असतो हे स्वराज्याकडे वाकडी नजर करणार्या सर्व शत्रूंना दाखवून दिले.

-शिवाजी पाटील

Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...