🚩🚩छत्रपती संभाजी महाराज!! 🚩🚩

प्रखर बुद्धिमत्ता, अफाट विद्वत्ता, उत्तम लेखक, कवी, असामान्य कर्तृत्व, निडर नेतृत्त्व, कुशल प्रशासक, महापराक्रमी, पराकोटीचे सहास अंगी असलेले, सर्वगुणसंपन्न, बहुभाषिक, प्रतिभाशाली, साहित्यिक, स्वाभिमान, स्वराज्यभिमानी, छत्रपती संभाजी महाराज! महान शासक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. नेहमी स्वराज्य नजरेसमोर ठेवून, शिवाजी महाराजांच्या तत्वांपासून कधीही न ढळलेले, त्यांनी घालुन दिलेल्या तत्वांवरती चालत, शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचे रक्षण करणारे. कल्पना करा की ते जिवंत असताना, त्याची बोटं तोडण्यात आली, त्याचे डोळे गरम सळीने खेचले गेले, जिभे तोडली गेली, सतत 40 दिवस हा छळ चालू होता. तरीही त्यांनी हे छळ सहन केले आणि औरंगजेबा समोर झुकण्यास नकार दिला, यातूनच त्यांचे खरे सामर्थ्य आणि अविश्वसनीय मानसिक खंबीरपणा दिसून येतो. शेवट पर्यंत अपराजित राहीले, आणि मृत्यूला देखील पराभूत करून गेले. असे हे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज नेहमीच महान राजांपैकी एक म्हणून नेहमीच लक्षात ठेवले जातील. अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा 🙏
Jai shambhu raje! 🚩🚩
#sambhajimaharaj #संभाजीराजे

-शिवाजी पाटील

Comments

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...