आठवणींचा खजाना आणि मनाची भरारी...
लाँकडाऊनच्या या काळात आता नवीन असे काही करता येत नसल्याने, निसर्गात मनसोक्त फिरता येत नसल्याने, मित्र, आपले स्नेही यांना भेटता येत नसल्याने, तोचतोचपणा आल्याने मन देखील कधीकधी खुप बोअर होते. आणि मग स्वतःचेच समाधान करण्यासाठी स्मृतीच्या कपाटातील जुन्याच आठवणी, जुन्याच घटना, जुनीच स्नेहस्मरणे काढून त्यांच्याशी खेळत बसते. आणि जर येवढ्याने देखील तहान शमली नाही, तर मग काल्पनिक आशेचे पंख पसरून भविष्यात भरारी घेण्याचा प्रयत्न करते. बुडत्याला जसा काठीचा आधार असतो तसेच मन देखील काल्पनिक पंखाचा आधार घेऊन उंच-उंच भरीरी घेते आणि जसे पक्षी आकाशात उंच उंच भरारी घेतात, परंतु सांजवेळी पुन्हा आपल्या घरट्याकडे येतात, अगदी तसेच मन देखील मनसोक्त हुंदडल्यानंतर पुनश्च वर्तमानात येऊन स्थिरावते. हे असे चाललय सध्या जीवन.
#मन_तो_मन_है_समझाने_से_थोडेही_मानता_है।
#मन_तो_मन_है_समझाने_से_थोडेही_मानता_है।
-शिवाजी पाटील
Comments
Post a Comment