हायब्रीड कायदा...
समाजातील संघर्ष टाळण्यासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे. पण आज जर आपण आपल्या आजूबाजूला पाहीले तर आपल्या लक्षात येईल की, समाज आणि कायदा यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आणि जेव्हा कायदा आणि समाज यामध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा समाजाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उभे राहते. सध्या आपल्या देशात जे चालले आहे, जसे की, नागरिकत्व कायद्याविरूध्द लोक रस्त्यावर उतरले होते, संसदेमध्ये देखील गदारोळ चालू होता. आज कृषी कायद्यांच्या विरोधात लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. जर कायदे लोकांसाठी असतात, तर मग त्याच कायद्या विरोधात लोक रस्त्यावर का उतरत आहेत?? सरकारने यावरती विचार करण्याची गरज आहे. स्पष्ट बहूमत याचा अर्थ मनमानीपणे वागणे, घटनेच्या मुळ गाभ्यालाच(धर्मनिरपेक्षता-ठराविक एका धर्माला वगळणे,राज्यांना डावलने) धोका पोहोचेल असे कायदे करणे असा होत नाही. या कायद्यामुळे केंद्र-राज्य संबंधामध्ये देखील ठिणगी पडली आहे. कृषी हा विषय समवर्ती सुचीत असता...

Comments
Post a Comment