Destiny of a nation is shaped in its classrooms. एखाद्या देशाचे भाग्य/भवितव्य त्याच्या शाळेत/वर्गात बनविले जाते.

          मुल जेव्हा जन्म घेते तेव्हापासूनच त्याचे सामाजिकीकरण सुरू होते. सामाजिकीकरणाचा पहिला टप्पा त्यालाच आपण प्राथमिक टप्पा आपण तो म्हणजे परिवार...आई-वडील, बहीण-भाऊ. त्यानंतर येतात ते मित्र (play group) ज्यांच्या सोबत मुल खेळते. ज्याला आपण समवयस्क ग्रुप म्हणतो. हाच ग्रुप त्याच्यावरती जास्त प्रभाव पाडत असतो, अशा गोष्टी शिकवितो ज्या त्याचे आई-वडील देखील शिकवत नाहीत (ज्या गोष्टी आई-वडीलांच्या नजरेत चुकीच्या असतात). 

           याच काळामध्ये आणखी एका नवीन व्यवस्था (संस्था) मुलाच्या आयुष्यात येते ती म्हणजे 'शाळा', 'शिक्षक'. आई-वडीलांच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये अनौपचारिकता हा एक घटक असतो परंतु शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्ये औपचारिकता असते, त्यामुळे त्या औपचारिक नात्याने शिक्षक काही नियम बनवतात. ज्यांचे पालन मुलांना करावे लागते. नियमांचे पालन करण्याची सवय मुलांना लावली जाते, ज्यामुळे मुले समाजात राहण्या लायक बनतात, समाजाचे नियम पाळतात. म्हणजे शाळेमध्ये देशाच्या भवितव्य निर्माण होत असते. शाळेमध्ये मुलांच्या वर्तमान निर्माण होत असतो. जर वर्तमान (पाया) मजबूत, योग्य असेल तर भविष्य देखील योग्यच असणार. 

           शाळेमध्ये जे देशाचे भविष्य निर्माण होत असते त्याचे तीन घटक आहेत- विद्यार्थी, शिक्षक आणि नियम आणि कायदे(rules and regulations?) मुले शिक्षकांच्या मार्फत नियमानुसार राहायला शिकतात. शिक्षकाची भमिका ही बहूअंगी (multiple) असते. एका बाजुला ते आई-वडीलांच्या भुमिकेत(रूपात) असतात (काळजी घेणे, care factor) आणि ज्ञान देण्यामध्ये ते गुरूच्या भुमीकेत (रूपात) असतात. आणि अनुशासन, शिस्त लावण्यामध्ये ते एका पोलिसाच्या भमिकेत असतात. 

            अनुशासन किंवा शिस्त हा सामाजिकीकरणाचा एक महत्वाचा भाग आहे. तु हे कर, ते करू नको, हे तुला करायलाच हवे. हे केले नाहीस तर तुला काय शिक्षा, दंड होईल हे सांगावे लागते, कधीकधी शिक्षा द्यावी पण लागते. परिवारामध्ये जास्त करून स्नेह आणि प्रेमाच्या धाग्यामुळे शिक्षा केली जात नाही. पण शाळेमध्ये केली जाते, त्यामुळे ईथे भय असते. ईथेच मुले कायदे कानुन शिकतात. 

            त्याचप्रमाणे मुले ईथे शक्ती, सत्ता (power center) काय असते हे शिकायला लागतात. त्याला कळायला लागते की प्रिंसिपल, पीटीचे सर किंवा मेडम हे शक्तीचे केंद्र आहे हे कळायला लागते.(power lies here). म्हणजेच राजकारणाचा पहिला पाठ ते ईथेच शिकतात. त्याला कळायला लागते की शक्तिशाली कोण आहे, जो शक्तीचा प्रयोग करतो, दंड देतो. 

            याव्यतिरिक्त तो ईथेच नैतिक-अनैतिकतेचा पाठ पण शिकतो. कारण जे दंडनीय, किंवा निषिध्द आहे ते नैतिकता-अनैतिकेतेमध्ये निहीत असते. (असे करू नको, तसे कर). घरामध्ये तो एकवेळ ऐकणार नाही परंतु शाळेमध्ये त्याला ऐकावेच लागते. कारण शाळेमध्ये नैतिकते सोबतच दंड, कायदे-कानुन पण जोडले गेले आहेत. परिवारामध्ये सामाजिक दंड, शिक्षा मिळु शकते (जेवायला न देणे, न बोलणे) पण यामुळे मुले बिघडू शकतात. परंतु शाळा ही अशी संस्था, व्यवस्था आहे जी मुलांना नियंत्रित करत असते. कारण बाहेर वावरत असताना त्याला निवडीचे स्वातंत्र्य (choice) असते. शाळेमध्ये नसते. त्याला युनिफॉर्म घालने बंधनकारक असते, म्हणजे शाळा, काँलेज मुलांना नियंत्रित करत असतात. 

             म्हणुनच आपल्याला जर आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करायचे असेल, तर आपल्याला आपल्या वर्तमानावरती लक्ष केंद्रित करायला हवे. जोपर्यंत आपण आपले वर्तमान योग्य रितीने निर्माण करणार नाही तोपर्यंत आपण आपल्या देशाचे भवितव्य घडवु शकणार नाही. आणि वर्तमान निर्माण कुठे होता तर शाळेमध्ये. अशा या देशाचे भवितव्य घडविणार्या शाळांना काळाशी सुसंगत अपडेट करून, त्याचे बाजारीकरण थांबवुन, योग्य धोरणे आखुण काळाशी सुसंगत करणे आवश्यक आहे. बालकांची जडणघडण हाच काळ महत्वाचा असतो, प्राथमिक स्तरावर भाषा, विज्ञान, वाचन, लेखन, गणित ते पायाभूत कौशल्ये विकासावर भर द्यायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणात या सर्वाचा विचार केलेला आहे. भारताचे भविष्य घडवायचे असेल तर सरकारने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची योग्य अशी अम्मलबजावणी झालीझाली पाहीजे. तरच हे धोरण पुढची पिढी आत्मनिर्भर भारतासाठी, नवनिर्माणासाठी सज्ज करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

हायब्रीड कायदा...

स्वयंप्रकाशित व्हा...!!

New scrap policy and the reality of in our country...