स्वयंप्रकाशित व्हा...!!
आपण स्वतः देशाला, समाजाला पुढे घेऊन जाण्यामध्ये एक महत्वाचा घटक आहोत. आपल्या देशाचे भविष्य हे आपल्या हातामध्ये आहे. आपल्या वर्तमानातील कृती याच देशाचे भविष्य ठरविणार आहेत. कोणीतरी महापुरूष येईल तो आपल्या देशाला तारेल या असल्या भ्रामक कल्पनांमध्ये रमण्यात काहीच साध्य नाही.
त्यासाठी स्वतःला त्यादृष्टीने तयार करावे लागेल, त्यासाठी चारित्रवान, जबाबदार, सदैव सेवेस तत्पर, कर्मयोगी नागरिकांची गरज आहे. आणि त्यासाठी आपणास परिश्रम करावे लागतील, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांची सांगड घालून कार्यरत राहीले पाहीजे. ज्ञानासोबत बलोपासनाही करावी लागेल.
महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास करावा लागेल, कारण त्यांनी महापुरुष/नारी होण्यासाठी कोणतेही क्लास लावसे नव्हते. नाही त्यांच्याजवळ दैवी शक्ती होत्या, त्यांनी आपल्यातील सर्व शक्ती जाणुन घेवुन त्याचा वापर केला, ते आपले कर्म करत राहीले, अगदी दृढ़ निश्चयाणे, न थकता- न थाबता, आपल्या निर्णयाशी ठाम राहीले, कोणत्याही संकटाला न घाबरता...
बरेच जण तर असे पण आहेत की त्यांना जीवंत असेपर्यंत कोणी ओळखतदेखील नव्हते, ते मृत्युनंतर महान बनले. नेमके कसे बनले ते महान??? कसे बनले ते महापूरूष??? कसे झाले ते मोठे?? विचार करा...
बनायचेच असेल कर बुध्द बना बौद्ध तर कोणीही बनेल...स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. गौतम बुध्दानी तेच केले, स्वतःचा मार्ग स्वतः तयार केला म्हणूुन ते महान बनले. छ. शिवाजी महाराजांनी देखील तेच केले, स्वतःचा मार्ग स्वतः तयार केला. इतरांनी मळलेल्या वाटेवर जर ते चालले असते तर तेदेखील फक्त इतिहासच बनुन उरले असते.
आज त्यांना आपण ओळखत आहोत त्याचे कारण त्यांनी त्यांच्या वाटा स्वतः तयार केल्या, म्हणूनच आजदेखील त्यांचा इतिहास आपणास वर्तमान कसा जगावा आणि भविष्यातकडे कसे पाहावे याची दृष्टि देतोय. म्हणुनच मी म्हणेल की, स्वयंप्रकाशीत व्हा( आत्म दिपो भव!!)
-शिवाजी पाटील
Very nice👍👍👍👍
ReplyDeleteमार्मिक लेखन.....
ReplyDeleteThnku brother 😊
Deleteमार्मिक लेखन.....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete👍
ReplyDeleteThnx 👍😊
Deleteमस्तच 👌👌👌
ReplyDeleteKhup chhan asech lihat Raha
ReplyDeleteThnku😊
DeleteNice����
ReplyDeleteNice👌🏻
ReplyDeleteThnx😊
Deleteखुप छान,
ReplyDeleteThnku 😊
Delete