"शब्द"
"शब्द"... खरच खुप ताकद असते शब्दांमध्ये. काही वेळेस आपण सहज बोलुन जातो, पण हेच सहज शब्द पुढील व्यक्तिस खुप मोठी जखम देवुन जातात. काही वेळेस ही जखम खुप खोल असते, कधीही न भरून येणारी.
काही वेळेस आपण पुढील व्यक्तीशी बोलत असताना, आपल्याकडून काही शब्द न कळत निघुन जातात, त्या शब्दांचा पुढील व्यक्ती चुकीचा अर्थ लावते, अगदी आपला उद्देश त्या व्यक्तिस दुखवीणे हा नसला तरी.. (याचा अर्थ असा ही असू शकतो की ती व्यक्ती तुम्हास समजुन घेण्यात कमी पडतेय किंवा तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आहेत.) आणि मग त्या व्यक्तीच्या पोटातील खर्या भावना ओठावर येतात आणि त्या व्यक्तीचे खोटेपण आपल्या समोर उघड होते. मग तीे व्यक्ती कदाचीत तुमचा जवळचा मित्र, मैत्रिण, प्रियकर किंवा प्रियसीही असु शकते.
असो...त्यामुळे आपल्या शब्दांना मौनव्रतरुपी बांध घालुन पुढे होणारे नुकसान टाळलेलेच बरे.
-शिवाजी पाटील
Comments
Post a Comment