Dangal... A motivational movie...
परवा दंगल मुवी पाहिला, खरच उत्कृष्ट मुवी आहे. सर्वांनी जरूर पाहावा असा. सर्वांनी स्वतःला झोकून देवून उत्कृष्ट भुमिका वटवलेली आहे. आमीर खानला Mr. Perfectionist का म्हणतात याची प्रचिती त्याचा मुवी पाहिल्यानंतर येते. कोठेही अतिशयोक्ती नाही, की गाण्यांचा भडीमार नाही.
ही कथा आहे एका बापाची(महावीर फोगट) आणि त्याच्या मुली गीता आणि बबीता यांची, आणि त्यांचे hard work, passion, dedication याची. एक बाप जो आपले देशासाठी gold medal मिळविण्याचे अपुर्ण राहीलेले स्वप्न आपल्या मुली पुर्ण करतील अशी अाशा ठेवुन त्यांना ट्रेन करतो. त्याचे आपल्या मुलीला बोललेले एक वाक्य त्याची साक्ष देतं... "मेरा सपना तब पुरा होगा, जब तु अपने लिए नही, देश के लिए गोल्ड लावेगीl" , आणि त्यासाठी स्वतःला झोकून देतो. गीता व बबीता या दोघीही आपल्या भावनेला महत्त्व न देता, कर्तव्याला महत्व देवुन, आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात.
मुलींना पहिलवान करायचे म्हटल्यावर विरोध ,अडथळे, निंदा, नालस्ती, टिका(Difficult challenges, bad days, moments of confusion- these things happen to keep us alert, make us stronger, to keep us moving forward.) या गोष्टी ओघाने आल्याच(पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता त्यावेळी हीच लोकं तुमचा जयजयकार करतात.), शेवटी पुरूषप्रधान मानसिकता म्हटल्यावर दुसरी काय अपेक्षा ठेवणार,(जेव्हा तुमच्यासोबत चालणारे कोणी नसेल, तेव्हा एकटे पुढे चालत राहा.) त्यासाठीही एक वाक्य बोलतात महावीर फोगाट... बस इतना समझलो, जो भी कर रहा हूँ उनके भले के लिए कर रहा हूंँl हर वो चीज पहिलवानी से उनका ध्यान हटाएगी मैं उसको हटऊंगाl
पण या सर्व गोष्टींवर मात करून त्या पुढे जातात. आपण का हरलो? कोठे कमी पडलो? या सर्व गोष्टींचा अभ्यास करत आपल्या खेळामध्ये सुधारणा करत त्या दोघी पुढे वाटचाल करतात.(if we wanted to change the situation, we first had to change ourselves. And to change ourselves effectively, we first had to change our perceptions). या सर्व गोष्टी आपण शिकण्या सारख्या आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जर यशस्वी व्हायचे असेल, तर आपणास अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.
Hats off Mahaveer fhogat, Gita, Babita and Amir khan and team your hard work and dedication... jai hind!!
Shivaji patil
Shivaji patil

Comments
Post a Comment